भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील अनेक रस्ते,सार्वजनिक शौचालय ,पाणी, व इतर मूलभूत सुविधा बाबत नुकतेच शिवसेना शिंदे गतातर्फे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच लवकरात लवकर स्वच्छता न झाल्यास कचरा पालिकेत टाकन्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला .

, भुसावळ शहरात सार्वजनिक शौचालय एकूण ४० ठिकाणी आहे,ह्या सर्व सार्वजनिक शौचालय ठिकाणी गेल्या ३ महिन्यापासून सफाई कामगार सफाई करण्यासाठी येत नाही आहे आणि त्या मुळे या ठिकाणी ह्या सर्व शौचालय घाणीने फुल भरून वरून घाण वाहत आहे,त्या मुळे येथे गुर्गंधी मुले लहान मुले व नागरिक आजारी पडत आहे,येत्या दोन दिवसात या सर्व ठिकाणी सफाई न झाल्यास आपल्या कार्यालयात ती सर्व घाण टाकण्यात येईल
२) तसेच मरी माता मंदिर ते नरेंद्र महाजन चौक हा कॉक्रीट रस्ता गेल्या ८ महिन्यापासून मंजूर आहे ह्या रस्त्याची टेंडर प्रोसेस पण झाली आहे कॉन्ट्रॅक्टर ला वर्क ओडर सुद्धा दिलेली आहे नगरपालिकेत या कामाचे ३ कोटी रुपये सुद्धा धूळ खात पडलेले आहे,तरी सुद्धा ह्या रस्त्याचे काम सुरू झालेले नाही हे काम सुद्धा येत्या ८ दिवसात सुरू करण्यात यावे नाही तर ह्याच जळगाव रोड वरती रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल
३) तसेच सध्या पावसाळा सुरू आहे भुसावळ शहरात हातावर पोट भरणारे अनेक व्यावसायिक आहे त्याचा त्या लहान मोठ्या वावसायावरच घर चालतात आणि अतिक्रमण काढायचेच असतील तर जे भुसावळ शहरात अनेक ठिकाणी इन लीगल बांधकाम झालेली आहे ते आधी काढावे व नंतर रोड वरील अतिक्रमण काढावे
४) तसेच भुसावळ शहरात स्वच्छतेचा विषय खूपच गंभीर झालेला आहे यावर तत्काळ उपाय योजना कराव्या अन्यथा लोकशाही मार्गाने आम्हाला जनतेला घेऊन आपल्या कार्यालयावर आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेना शिंदे गटाचे दीपक धांडे,दिपक सोनवणे,नरेंद्र लोखंडे, पिंटू भोई,जितू पाटील,योगेश वाघ ,भूषण भोई,रवी तायडे,संतोष मेंबर,दिलीप भाई,पिंटू पळशीकर,रोहित वराडे,शांताराम भील व शिवसैनिकांनी दिला आहे


