जळगाव जिल्ह्यातील 19 वर्षीय विवाहितेची आत्महत्या –

जळगाव जळगाव तालुक्यातील लमांजन येथे 19 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना सोमवार, 14 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अश्विनी गणेश पाटील (19, रा.लमांजन ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे,
अश्विनी पती, सासू यांचेसह राहत होती. अश्विनीचे पती गणेश पाटील हे मेरिको कंपनीत कामगार आहेत तर तिचे माहेर गावातच असून वडील सुधाकर पाटील हे शेतीकाम करतात.

सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अश्विनीची सासू शेतातील कामे आटोपून घरी परतली तेव्हा अश्विनी दरवाजा उघडत नव्हती. हे पाहून तिने खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला तर अश्विनीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

यावेळी सासूने आवाज दिल्यानंतर शेजारचे नागरिक धावत आले. ग्रामस्थांनी अश्विनीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी तिला तपासून मयत घोषित केले. आत्महत्येचे कारण समजून आले नाही.