भुसावळ (प्रतिनिधी ) – सकल लेवा महिला मंडळ भुसावळ परिसर आयोजीत आखाड भोजन स्नेह संमेलन नुकतेच . १३ जुलै रविवार रोजी प्रभाकर हॉल, भुसावळ येथे अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरे करण्यात आले .प्रसंगी आयोनीत आखाड भोजनात खीर वडे भजे गुलगुले आदी रुचकर पदार्थांचा आस्वाद सर्व महिला भगिनींनी .भरपेट घेतला . यावेळी कोणत्याही 5 स्टार हॉटेल मध्ये अशी मेजवानी मिळणार नाही म्हणत भोजनाचे कौंतुक केले .

यावेळी सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा, आदरणीय सौ. मंगलाताई पाटील तसेच उपाध्यक्षा प्रभाताई पाटील, सचिव राजश्री कोलते, खजिनदार स्वाती भोळे, व सकल लेवा महिला मंडळाच्या कार्यकारणी सदस्या सौ मनिषा पाटील व वैशाली चौधरी यांनी कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी सकाळपासून सर्व कामांचे विभाजन करून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले . तर संध्या भोळे, वर्षा लोखंडे, मेघा कुरकुरे, मनिषा पाटील यांनी नाट्यछटा सादर केल्या डॉ मृणाल पाटील कल्पना शिंदे, वैशाली पाटील तसेच सहकार्यकारणी सदस्या, मोना भंगाळे, अनिता महाजन,मिनाक्षी धांडे, सोनल महाजन तसेच उत्सव समिती सदस्या जयश्री चौधरी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमास 135 महिलांनी उपस्थिती नोंदविली. आखाड स्नेहसंमेलनामध्ये सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांनी आपली ओळख करून दिली. अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या अंगी असलेल्या सुप्तकलागुणांना प्रतिसाद देण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, उखाणा, नृत्य, गायन सादर करण्यात आले. उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांकांचे बक्षिस सौ. हेमाक्षी बोंडे व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ. वर्षा पाटील यांना मिळाले तसेच कपाळावर बिस्कीट ठेऊन खाणे स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस सौ. जागृती चौधरी व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ. आश्विनी चौधरी यांना मिळाले. डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करणे या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस सौ. आश्विनी चौधरी व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ.वैशाली शिंदे यांना मिळाले. सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिस वाटप करण्यात आले.कार्यक्रमास सर्वच उपस्थित महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रसंगी सरप्राईज गिफ्ट सुद्धा देण्यात आले. डॉ.मृणाल पाटील यांचे नेहमी खुप उत्साहाने सहकार्य मिळते त्यांनी या वेळी पण कार्यक्रमासाठी प्रभाकर हॉल उपलब्ध करून विशेष सहकार्य केले. खर तर आखाड भोजन नियोजन फार कठीण गव्हाची खीर उडदाच्या डाळीचे पारंपारीक वडे मिरची भजी गुलगले कढी भोजनाचा आस्वाद घेतला. अश्या प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात आखाड उत्सव व आखाड स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला



