विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी – निना कटलर ;

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथिल ताप्ती पब्लीक सीबीएसई इंग्लीश मिडीयम स्कुल मध्ये प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी माहिती दिली. सध्या डेंगू,मलेरिया,कावीळ, टायफेट,थंडी,ताप,खोकला,सर्दी अश्या विवीध प्रकारच्या आजाराची सात सुरु आहे. गल्लो गल्ली दवाखाने फुल्ल आहेत. अशातच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आजारापासून बचाव व्हावा यासाठी ताप्ती पब्लीक स्कुलच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी विद्यार्थ्याना विवीध टिप्स दिल्या. त्या म्हणाल्या की शाळेतून घरी गेल्यावर हात पाय व्यवस्थित धुवून बसावे.तसेच कोणीही विद्यार्थी आजारी असल्यास त्याने स्वतःचे टावेल साबण हे वेगळे ठेवावे.जास्तीत जास्त स्वच्छता ठेवावी.पाणी गाळून व उकळून प्याने.शिळे अन्न खाऊ नये.तसेच बाहेरील उघड्यावरील अन्न खाऊ नये.घराबाहेर शक्यतो जाऊ नये.डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधी गोळ्या घ्यावी.तसेच स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी.अशा विवीध टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.तसेच शाळा परिसरात देखील त्यांनी स्वच्छता ठेवलेली आहे व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी देखील शाळा प्रशासनातर्फे व शिक्षकांतर्फे घेतली जात आहे.

फोटो कॅप्शन – भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना आरोग्या विषयी माहिती देताना प्रिंसीपल निना कटलर.