भुसावळ (प्रतिनिधी ) - भुसावळ येथील प्रभाकर हॉल मध्ये रोटरी इंटरनॅशनलच्या आधीन असलेल्या इंटरनॅशनल फेलोशिप ऑफ रोटरीयन म्युझिशियन (IFRM) या विश्वव्यापी संस्थेच्या Euphoria नामक जळगाव शाखेचा 2025-26 साठीचा पदग्रहण समारंभ दि 13 जुलै रोजी, नुकताच पार पडला.
यावेळी मावळते अध्यक्ष डॉ सुशीलकुमार राणे व सचिव सौ तृप्ती बाक्रे यांनी पदभार नवीन अध्यक्ष श्री संदीप जोशी यांना सुपूर्द केला. तसेच डॉ श्री राहुल पांडे यांनी सचिव (admin) आणि सौ नेहा नैनानी सचिव (प्रोग्राम) असा पदभार स्वीकारला व स्मिता बाफना यांनी खजिनदार पदाची सूत्रे स्वीकारली.
यासाठी मुख्य अतिथी म्हणून आयएफआरएमचे ग्लोबल चेयरमन पद्मनाभन उपस्थित होते. तसेच यासाठी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व Euphoria सदस्य संजयजी सावकारे देखील उपस्थित राहणार होते परंतु विधानसभेच्या कामकाजमुळे ते येऊ शकले नाही. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ श्री आशुतोष केळकर व डॉ सौ सुजाता केळकर हे उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या हार्मोनिका वर बहारदार गाणे वाजवत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी IFRM च्या नाशिक शाखेचे पदाधिकारी पण उपस्थित होते. विविध सदस्यांनी आपापली गायन कला सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. सुरज जहांगीर, डॉ अजय शास्त्री, व सौ शिल्पा साफळे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ तृप्ती बाक्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी सर्व Euphoria सदस्य तसेच भुसावळ, जळगाव, पुणे, नाशिक आदी ठिकाणाहून रोटरी सदस्य व मान्यवर उपस्थित होते.