भुसावळ (प्रतिनिधी ) – बामनोद नजिक असलेल्या सुनासावखेडा येथील कष्टभंजन हनुमान मंदिरात गुरुपौर्णिमा निमीत्त हनुमान भक्तांनी रक्तदान करून गुरुना गुरुदक्षिणा वाहिली . दिनांक 10जुलै रोजी गुरुपौर्णिमा निमीत्त कष्ट भंजन हनुमान भक्तानी गुरू दक्षिणा म्हणून रक्त दान केले

यावेळी कष्ट भंजन हनुमान मंदिर सूना सावखेडा येथील मंदिराचे स्वामी जगत प्रकाश दास जी,स्वामी जय प्रकाश दास जी, व भगत गिरीष जी यांचे विधिवत गुरू पूजन मंदिराचे सेवेकरी राजेश राणे दादा नितिन वाघलदे व शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख निलेश महाजन यांचे मार्फत गुरू पूजन कऱण्यात आले.
तदनंतर मंदिराचे विश्वस्त मंडळ यांचे तर्फे मंदिर आवारात आयोजित रक्त दान शिबिरात बहुसंख्य रक्त दात्यानी रक्त दान करून गुरुपौर्णिमा निमित्त गुरुदक्षिणा दिली . प्रसंगी मंदिराचे स्वामी जगत प्रकाश दास जी जयप्रकाश दास जी, गिरीष भगत, नितिन वाघुलदे, राजेश राणे, निलेश महाजन, यांचेसह हनुमान भक्तांनी शिबीर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले यावेळी मोठ्या संख्येने शिष्यव हनुमान भक्त उपस्थित होते


