*गुरुपौर्णिमेला गुरूंना नमन करत मातृभूमीला गुरूंना प्रिय असलेले व इतर संगोपनासहित प्रसाद रुपी वृक्ष लावण्याचा संकल्प करूया. असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी व्यक्त केले * 10 जुलै 2025 गुरुपौर्णिमा सर्व दूर मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते . आपल्या* संस्कृतीत गुरूंना मोठे स्थान आहे .गुरु म्हणजे आपले आदर्श गुरूंमुळे आपली संस्कृती ,सभ्यता माणुसकी टिकून आहे. पाहिले गुरु आपले आई वडील त्यानंतर शिक्षण घेताना बालवयातच आपल्याला संस्कार देणारे आपले शिक्षक बालवयातत जे संस्कार आपल्यावर पडतात त्याचा कायमस्वरूपी प्रभाव जाणवत असतो. त्यानुसार पुढील वाटचाल सुरू असते.त्यानंतर आपले आई-वडील तसेच आपण देवाचे तसेच त्यांना प्रिय असलेल्या गुरूंचे दर्शन घेऊन आपली दिनचर्या सुरू असते. गुरूमुळे आपल्या आचरणात भरपूर बदल होऊन आपण नम्र,शांत, संयमी चांगली भावना चांगले आचार विचार अशा अनेक गोष्टीवर आपल्यात व आपल्या मुला बाळांवर बदल होत असतो या गुरुपौर्णिमेला आपल्या मातृभूमीस मातृ म्हणजे माता म्हणजे भूमाता सद्यस्थितीत काही कारणास्तव भूमातेवर असलेल्या निसर्गनिर्मित संपत्तीचे मोठ्या प्रमाणात हानी झालेली असल्याने निसर्गाचा समतोल ढासळलेला असल्याने अनेक संकटांना आपला सामोरे जावे लागत आहे . निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आपल्या मातृभूमीवर म्हणजेच भूमातेवर भूमीस आवश्यक असलेल्या तसेच आपल्या सद्गुरूंना प्रिय असलेल्या प्रसाद रुपी वृक्षदेवतेची संगोपनासहित स्थापना करण्याचा संपूर्ण परिवारासह संकल्प करूया सद्गुरूंना तसेच भूमातेला खरोखर आवश्यक असलेला प्रसादही मिळेल तसेच आपले आदरणीय पंतप्रधान यांनी सुरू केलेल्या एक पेड मॉ के नाम अभियान 2 यातही संपूर्ण कुटुंबाचा सहभाग होऊन आपले कर्तव्य म्हणून आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केल्याचा आपणास अभिमान राहील.



