भुसावळात हॉकर्स व हातगाडीचालक यांचेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना उबाठातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन ; अतिक्रमण न थाबवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा दिला इशारा –

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळात हॉकर्स व हातगाडीचालक यांचेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ शिवसेना उबाठातर्फे पालिकेने त्वरित अतिक्रमण थाबवावे या मागणीसाठ मुख्याधिकारी यांना आज 8 जुलै रोजी निवेदन देण्यात आले पालिकेने त्वरित अतिक्रमण थाबवावे न थाबवल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला .

आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व वंदनीय। स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या 80%समाजकारण व 20%राजकारण याच प्रेरणेने तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमूख गुलाब वाघ व जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत यांचे मार्गदर्शनात भुसावळ तालुका प्रमूख निलेश महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत.भुसावळ हॉकरर्स (हातगाडी) चालक यांचेवर झालेल्या अण्यायाच्या निषेधार्थ मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले .

निवेदनात नमूद आहे की पालिकेतर्फे काढण्यात येणारे अतिक्रमण नियम बाह्य आहे जे अतिक्रमण काढले त्याच्या न्याय हक्कासाठी नगरपालिका मुख्य अधिकारी यांना पावसाळ्यात अतिक्रमण काढू शकत नाही अश्या आशयाचा शासनाचा जी आर असून सुध्दा अतिक्रमण काढले त्यांना परत कामधंदे त्याच ठिकाणी लावू द्यावे पालिकेने सदर अतिक्रमण काढू नये .त्वरित थाबवावे तसे न केल्यास शिवसेना स्टाईल ने आंदोलनं करु असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख यांच्या मार्फत दिला

यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक उत्तम सुरवाडे, रेल कामगार सेनेचे ललित मुथा उप जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिलिप सुरवाडे,, उप तालुका प्रमूख रहीम भाई गवळी, योगेश बागुल, अनिल पाटील, मकबूल मेंबर, शरद जयस्वाल,, शरद जोहरे, राजु इंगळे,, हेमंत खंबायात,, गणेश सोनवणे,, करणं खरारे,, ऍड शाम श्रीगोंदेकर,, तसेच हॉकर्स असोसिएशन चे अध्यक्ष राजु सपकाळे,, सुरेश थेटे,, जावेद खान,, गणेश चौधरी,, इम्रान शब्बीर,, शशिकला सकट,, समीर देशमुख,, विनोद ओतारी,, व आदी शिवसैनिक व हातगाडी विक्रेते उपस्थित होते.