भुसावळ (सा वा ) – भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या अहिल्यादेवी कन्या शाळेपासून ते अप्सरा साडी सेंटर दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुरू असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व डिव्हायडरच्या कामावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवला असून बाजारपेठेत होत असलेले मुख्य मिरवणुक मार्गावर होणारे डिव्हायडर बांधकाम तात्काळ बंद करावे तसेच या रस्त्यावर दुभाजक होऊ नये या प्रमुख मागणी साठी आज मंगळवार 8 जुलै रोजी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षा चे वतीने व माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण याच प्रेरणेने तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमूख गुलाब वाघ व जिल्हा प्रमुख दिपक सिंग राजपूत यांचे मार्गदर्शनात भुसावळ तालुका प्रमूख निलेश महाजन यांचे प्रमुख उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी तायडे साहेब यांना निवेदन देण्यात आले .

भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेत अहिल्या देवी कन्या शाळे पासुन ते अप्सरा साडी सेंटर पर्यंत ज्या रस्त्याचे निविदा काढली आहे त्यात मध्य भागी जे दुभाजक कऱण्यात येत आहेत ते होऊ नये त्याचे कारण असे की सदर रस्ता हा शहरातील व मुख्य रस्ता असल्याने त्या ठिकाणाहून सण उत्सव काळात विविध समाजातील धार्मिक मिरवणुका सह गणेश उत्सव, नवरात्र, अश्या उत्सवाच्या मिरवणुका या रस्त्याने या मार्गाने जात असतात या डिव्हायडर मुळे त्यांना अडथळा निर्माण होऊन अनुचित घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही त्यामूळे तेथील डिव्हायडर रद्द करावे अशी तक्रार वजा मागणी करण्यात येऊन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अधिकारी तायडे साहेब. यांना तक्रार निवेदन दिले तायडे साहेब यांनी त्या निविदे मधून रद्द बदल करतो . असे आश्वासन दिले.
प्रसंगी तालुका प्रमूख निलेश महाजन यांनी दुभाजक झाल्यास शिवसैनिक शिवसेना स्टाईल ने आंदोलनं करणार असा इशारा दिला. यावेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक उत्तम सुरवाडे,रेल कामगार सेनेचे ललित मुथा , उप जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दिलिप सुरवाडे,, उप तालुका प्रमूख रहीम भाई गवळी,, योगेश बागुल,, अनिल पाटील,,मकबूल मेंबर,, शरद जयस्वाल,, शरद जोहरे,, राजु इंगळे,, हेमंत खंबायात,, गणेश सोनवणे,, करणं खरारे,, ऍड शाम गोंडेकर,, तसेच होकार असोसिएशन चे अध्यक्ष राजु सपकाळे,, सुरेश थेटे, जावेद खान,, गणेश चौधरी,, इम्रान शब्बीर,शशिकला सकट , समीर देशमुख, विनोद ओतारी, व आदी शिवसैनिक व हातगाडी विक्रेते उपस्थित होते.



