भुसावळ (प्रतिनिधी ) – आषाढी एकादशी निमित्त भुसावळातील महिला पतंजली योग साधकांची ‘ योग वारी ‘ उत्साहात साजरी करण्यात आली .
दिनांक ६ जुलै रविवार रोजी सकाळी 5:30 ते 7 या वेळेत भुसावळ मधील महिला पतंजली चे सर्व योग वर्ग एकत्रित. आले व त्यांनी
माऊली टाळ वर आपली योगमय वारी काढली यावेळी टाळ वाद्यात योगवर्गातील भगिनींनी खूप सुंदर असे सादरीकरण केले .छोटे गोपाळ विठ्ठल रुक्माई व वारकरी झालेले होते .


तदनंतर शहरातील आलेल्या बायकांनी टाळ वर छान पावली खेळल्यानंतर विठ्ठलाची आरती करून वारीची सांगता करण्यात आली
*या वोगमय वारीत 80 वयाच्या महिलांनी सुद्धा खुप सुंदर असे सादरीकरण वारीमध्ये केले .
अतिशय आनंदी व योगमय वातावरणात ही योग वर्गातील वारी सर्वांनाच पंढरपूरच्या वारीचा आनंद देऊन गेली . यशस्वितेसाठी योग साधक महानंदा पाटील व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले .



