पंढरपूर –
पवित्र देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी संत मुक्ताई पालखी सोहळ्याचा ३१ वा दिवस अत्यंत उत्साहात व भक्तिभावात संपन्न poझाला. या शुभदिनी पालखी सोहळ्याचा मुक्काम संत मुक्ताई मठ, श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होता.

सकाळच्या सत्रात ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे (प्रमुख – संत मुक्ताLKKई पालखी सोहळा) यांची भावपूर्ण कीर्तन सेवा पार पडली. त्यांनी संतपरंपरेतील आदर्श जीवन, भक्तीमार्गाचे महत्व आणि विठ्ठलभक्तीचा वारकरी परंपरेतील अनमोल ठेवा यावर प्रभावी कीर्तन सादर केले. त्यांच्या कीर्तनातून उपस्थित वारकऱ्यांना अध्यात्मिक समाधान, भावनिक उर्जा आणि संतांच्या जीवनातून प्रेरणा मिळाली.
या पावन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मंत्री मा. ना. संजयजी सावकारे यांनी संत मुक्ताई पालखी सोहळ्यास भेट दिली. त्यांनी संत मुक्ताईंचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केला तसेच उपस्थित वारकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्यासाहेब पाटील, मठातील पदाधिकारी व असंख्य भाविक उपस्थित होते.
संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत, या कार्यक्रमाने वारकरी संप्रदायातील भक्ती, निष्ठा आणि ऐक्याचा अनमोल वारसा अधिक उजळून निघाला.



