फैजपूर – फैजपूर – भुसावळ रस्त्यावर आमोद्या जवळ प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाखाली कोसळून भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली.

आज रविवार ६ जुलै रोजी सकाळी यावल तालुक्यातील आमोदा- फैजपूर रस्त्यावर इंदोरहून जळगावकडे येणारी प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खासगी बस पुलाचा कठडा तोडून थेट पुलावरून सुमारे २० ते २५ फूट खाली कोसळली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून २५ ते ३० प्रवासी जखमी झाल्याचे समजते.
स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पोलिसाना या बाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीसही पोहोचले असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप अपघाताचे कारण समोर आलेले नसले तरी चालकाचे नियंत्रण सुटल्या मुळे अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.


