ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी उत्साहात संपन्न.

भुसावळ(प्रतिनिधी ) – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी वारकरी बनून आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या वेशभूषा साकारून त्यांनी शाळेत दिंडी काढली होती. विठ्ठलाच्या नाम गजरात टाळ ,मृदुंग यांच्या तालावर ठेका घेऊन पावली खेळत तसेच अभंग व गाणी सादर करत विद्यार्थ्यांनी शाळेत दिंडी काढली होती. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर यांनी दिंडीचे व पालखीचे पुजन केले.इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात सादरीकरण केले ,तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व यावेळी सांगण्यात आले तर उपवास का करावा त्याचे महत्त्व तसेच वारकरी संप्रदायाची सुरुवात कशी झाली व कोणी केली याबद्दल विद्यार्थ्यांना प्रिन्सिपल निना कटलर यांनी सांगितले. सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी अभंग म्हटले तर काही विद्यार्थ्यांनी महत्त्व सांगितले.अतिशय उत्साहात आषाढी एकादशी सोहळा शाळेत साजरा करण्यात आला

.फोटो ओळ —- भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई च्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी.


फोटो ओळ ….. भुसावळातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी सोबत उपस्थित प्रिन्सिपल निना कटलर.