भुसावळ (प्रतिनिधी ) – दि. ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी ने मागील वर्षी सदस्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 झाडे लावून वृक्षारोपण प्रोजेक्ट राबवला होता. त्यांचा पुष्पहार अर्पण करून व पूजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पुन्हा नवीन सुरवात या वर्षी देखील पालखी हॉटेलच्या मागे आणखी दहा नवीन झाडे वड, पिंपळ,बेल,करंज, आवळा, निम, कडुबदाम,शमी अर्जुनसाल तेथील मंदिराच्या परिसरात आज लावण्यात आली

,याही झाडांचे पालकत्व हे झाडे मोठे होईपर्यंत तेथील परिसरातल्या लोकांनी घेतले. हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवण्यासाठी त्याला लागणारे रोप हे प्रेसिडेंट सीमा सोनार आणि ट्री गार्ड हे रोटरीन अनिल सहानी यांनी दिले

या प्रसंगी 1 जुलै मंगळवार रोजी इनरव्हील क्लब ऑफ भुसावल रेल सिटी ने डॉक्टर्स डे निमित्त क्लब मधील सदस्या डॉ. मृणाल पाटील, डॉ. कीर्ती चांदवडकर, डॉ. आरती चौधरी यांना भेट वस्तू देऊन डॉक्टरांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. येथील मंदिराच्या परिसरात आज क्लब सदस्य आणि महिला वर्ग उपस्थित होता.
प्रोजेक्ट यशस्वी करण्याकरता क्लब अध्यक्ष सीमा सोनार सेक्रेटरी योगिता वायकोळे,प्रोजेक्ट चेअरमन सदस्या मोना भंगाळे आणि रेवती मांडे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.



