भुसावळ (प्रतिनिधी ) – आषाढ मासातील शुद्ध शुक्ल पक्षातील सप्तमीस तापी नदीचा जन्मोत्सव साजरा केला जातो याच औचित्य साधून भुसावळ येथील साईनिर्मल फाउंडेशन तर्फे तापी जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला . याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून आमोदा येथील निर्मोही आखाड्याचे संत श्री. कन्हैया दासजी महाराज , तसेच इस्कॉन चे प्रभू स्वामी जी , निसर्ग पर्यावरण मंडळाचे स्वाती भोळे, लेवा सखी मंडळाचे मंगला पाटील, सिताराम कन्स्ट्रक्शन चे भूषण वराडे माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी डॉक्टर सुनील पाटील, हिंदू जागरण मंच च्या च्या प्रगती पाटील , जय गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते सर बापू महाजन उपस्थित होते यावेळी
पंच निर्मोही आखाड्याचे आमोदा येथील संत श्री. कन्हैया दास जी महाराज फैजपूर तसेच इस्कॉन चे प्रभू स्वामी जी , बहिणाबाई ब्रिगेडचे ,निसर्ग पर्यावरण मंडळाचे स्वाती भोळे, लेवा सखी मंडळाचे मंगला पाटील, सिताराम कन्स्ट्रक्शन चे भूषण वराडे माजी कृषी अधिकारी दिलीप चौधरी डॉक्टर सुनील पाटील, हिंदू जागरण मंच च्या प्रगती पाटील , जय गुरुदेव जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रकाश विसपुते , डॉक्टर तनुज पाटील ,सर बापू महाजन , यावेळी संस्था अध्यक्ष शिशिर जावळे यांच्या व इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते तापी नदीचे पूजन करून तापी नदीस महा वस्त्र अर्पण करून सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिशिर जावळे यांनी प्रास्ताविक केले . तसेच तापीचे महात्म्य आणि सनातन धर्म यावर पंच निर्मोही आखाड्याचे आमोद येथील संत कन्हैया दास महाराज यांनी मार्गदर्शन केले. इस्कॉनचे प्रभुस्वामिनी सुद्धा यावेळी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी तापी घाट विकसित करून तापी नदीतील प्रदूषण कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि परिसर स्वच्छतेसाठी तापीची नदीची सर्व 18 पगड जातीं धर्माच्या भक्तांना सोबत घेऊन साप्ताहिक आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोहन कासार, ललित नेहेते,हीतेंद्र कोलते ,किरण पाटील, पवन चावरिया, विशाल बोरोले, अनिल पाटील आदींनी परिश्रम घेतलेत.



