आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक व राज्य शासन अधिकाऱ्यांमध्ये समन्वय बैठक


भुसावळ (प्रतिनिधी ) –

आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री माननीय श्रीमती रक्ष खडसे यांनी आज दिनांक 19 जून 2025 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे तयारींचा आढावा घेतला. संपूर्ण देशभर एकसंध आयोजन सुनिश्चित करण्यासाठी हा समन्वयाचा भाग होता.

या अनुषंगाने विभागीय रेल्वे कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इती पांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण समन्वय बैठक घेण्यात आली. या बैठकीत रेल्वे प्रशासन व विविध राज्य शासन विभागांमध्ये समन्वय निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

बैठकीस जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, वरिष्ठ शाखा अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन या दोघांनीही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असून, परस्पर समन्वयाने कार्य करण्याची ग्वाही दिली आहे