भुसावळ येथे सीआरडब्ल्यूडब्ल्यूओ ‘संस्कृती’ प्रायमरी इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना अंतर्गत ‘संस्कृती’ प्राथमिक इंग्लिश मिडियम स्कूल, भुसावळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन दिनांक १८ जून २०२५ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पाण्डेय यांच्या हस्ते संपन्न झाले.

या नव्या इमारतीमध्ये तीन वर्गखोल्या व एक संगणक प्रयोगशाळा (कंप्युटर लॅब) समाविष्ट आहे. या नव्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व सुसज्ज शिक्षणाचे पर्यावरण लाभणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल.

या प्रसंगी सीआरडब्ल्यूडब्ल्यूओच्या अध्यक्षा, इतर पदाधिकारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.