भुसावळ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ, येथे दिनांक १५ रविवार रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, पंचायत समिती भुसावळ येथे “अनिस कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर” उत्साहात आयोजित करण्यात आले. या शिबीराला मोठा प्रतिसाद मिळाला.

मुख्य प्रशिक्षक आद. विनायक सावळे, राज्य सरचिटणीस अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शहादा यांची उपस्थिती होती. शिबीराची सुरुवात आद. शामकुमार वासनिक यांनी “चमत्कारा मागील विज्ञान” समजून सांगून केली. यानंतर अनिस समितीची भूमिका आद. सुभाष लोखंडे यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद. शांताराम जाधव यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सुमंगल आणि रविंद्र अहिरे होते, आणि यावेळी कार्यक्रमाचा उद्घाटन पारंपरिक पद्धतीने “काळी बाहुली लिंबू मिरची जाळून” करण्यात आले.

कार्यक्रमात सागर एस. बहिरून, ळ दीपक तुळशीराम बनसोडे, प्रेम परदेशी, ,श्री भटकर सर उपस्थित होते

मान्यवरांच्या सत्कारानंतर, विनायक सावळे यांनी समाजात फोपावलेल्या अंधश्रद्धेविषयी सविस्तर विवेचन केले, आणि नंतर उपस्थितांची भोजन व्यवस्था करण्यात आली.

दुसऱ्या सत्रात अनिस कार्यकर्त्यांची भूमिका आदरणीय विनायक सावळे यांनी सादर केली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण आदरणीय सुमंगल आणि रविंद्र अहिरे यांनी दिले, तर आभार प्रदर्शन आद. सुभाष लोखंडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आद. शांताराम सिताराम जाधव कार्याध्यक्ष, आदरणीय विजय रामदास बार्हे व इतर मान्यवरांनी महत्त्वाची भूमिका पार केली.

शिबीराला उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा. निलेश समाधान गुरचळ, आद. राजेंद्र रमेश गणवीर, आद. अरुण मोतीराम दामोदर यांचा समावेश होता. यावेळी भारतीय बौध्द महासभेचे मान्यवर पदाधिकारी व तालुका बौद्ध महासंघाचे सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम अंधश्रद्धा निर्मूलन समिती भुसावळच्या कार्याची महत्त्वाची ठिकाणी आहे, ज्यामुळे समाजाच्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रवास पुढे चालू राहील.