मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा येथील लेकीला मिळाला राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार ;

मुक्ताईनगर –
वडोदा माहेर असलेल्या वडोदा येथील माजी सरपंच किशोरभाऊ खिरोळकर यांची लाडकी लहान बहिन उषाताई सदाशिव खिरोडकर उर्फ उषाताई विठ्ठलराव थेरोकार सरपंच लांजुड ता. खामगाव . जि. बुलढाणा . यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच सन्मान २०२५ चा आदर्श सरपंच पुरस्कार देण्यात आला.
. आपल्या गावाच्या विकासाचा ध्यास घेऊन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी प्रशासन तसेच ग्रामस्थांच्या मदतीने आपल्या गावात ग्रामपंचायत च्या माध्यमातुन विविध योजनांच्या साहयाने तसेच , लोकसहभाग , स्वखर्च , आमदार निधी खासदार निधी च्या सहाय्याने युवावर्ग जेष्ठ मंडळी महिला व समस्त . गावकरी मंडळी यांच्चा सहाय्याने सर्वसामान्य जनतेसाठी विविध विकास कामे करून तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात नाव लौकीक मिळवला. त्यांच्या याच कार्याचा गौरव व्हावा म्हपूण स्वराज्य सेवा संघाच्या वतीने त्यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.