भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विभागातील जळगाव–मनमाड या खंडामध्ये तिसऱ्या मार्गाच्या जोडणीसंदर्भात माहेजी येथे यार्ड रीमॉडेलिंगचे कार्य करण्यात येणार असून, त्यासाठी १२ जून २०२५ रोजी नॉन इंटरलॉकिंग (NI) कार्य करण्यात येणार आहे. या कामांमुळे काही गाड्यांच्या सेवा प्रभावित होतील.

दिनांक १२.०६.२०२५ रोजी गाड्यांवर होणारे परिणाम –
दिनांक १२.०६.२०२५ रोजी गाड्याचे रद्दीकरण
▪ ११११९ इगतपुरी–भुसावळ मेमू
▪ १११२० भुसावळ–इगतपुरी मेमू
गाड्या खंड मध्ये नियंत्रित करण्यात येतील.(रेग्युलेशन)
▪ १२७४१ वास्को-दी-गामा- पटना एक्सप्रेस गाडी सुमारे १.३० तास नियंत्रित
▪ १२१७१ एलटीटी- हरिद्वारगाडी सुमारे ०.४५ मिनिटे नियंत्रित
▪ ०५५५८ एलटीटी–रक्सौल एक्स्प्रेस सुमारे ०.४५ मिनिटे नियंत्रित
गाड्यांचे पुनःनिर्धारण (Rescheduling)
▪ १२१६५ एलटीटी– गोरखपूर (एक्स्प्रेस) गाडीचा प्रस्थान स्टेशन येथून ०६.०० ऐवजी ०७.४५ वाजता सुटेल. १.४५ तास उशिराने सुटेल.
▪ १५०१७ एलटीटी–गोरखपूर एक्स्प्रेस गाडीचा प्रस्थान स्टेशन येथून ०६.३५ वाजता ऐवजी ०७.३५ वाजता सुटेल. १.०० तास उशिराने सुटेल.
हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाली व संरक्षक दृष्टीने आवश्यक आहेत. प्रवाशांनी होणाऱ्या असुविधेबद्दल सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासन करत आहे.


