भुसावळ – भुसावळ शहरातील घोडेपीर बाबा रोडवरील मोरया हॉल मागील रहिवासी भारत सुरेंद्र शर्मा .वय २४ वर्ष. या तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता घडली.

भारत हा सुरेंद्र शर्मा यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो देखील वडिलांप्रमाणेच इलेक्ट्रिकचे काम करत होता. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भारतचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, जिथे शवविच्छेदन करण्यात आले. या करणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


