अमळनेर – तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक आणि हिंदू संघटनांनी आरोपीची चांगलीच धुलाई केल्याचे समजते. ही घटना दि.१ जून रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास घडली.

ब , तालुक्यातील एका गावात घराच्या बांधकामांच्या ठिकाणी मिस्तरी काम करणारा समीर अक्रम अली खान (वय २२ रा. अमळनेर) हा गल्लीतील अल्पवयीन मुलीकडून पिण्यास पाणी मागितले. त्यानंतर त्याने घरात घुसून मुलीचा हात पकडला व आपण उद्या पळून जाऊ असे तिला सांगत त्याचा मोबाईल नंबर दिला. फोन करेल तेव्हा आपण पळून जाऊ असे सांगत त्याने ही गोष्ट कोणाला सांगितल्यास मुलीला व आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी दिली. सदर मुलीने आईवडिलांना हकीकत सांगितल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन त्याला चोप दिल्याची माहिती असून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी देखील याठिकाणी हजेरी लावली होती.
सदर आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी मारवड पोलिसांत आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३२९ (४), ३५१(२) पोक्सो कायदा कलम १२ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत.


