भुसावळ ( प्रतिनिधी) : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षा व मदतीसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत, मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) आज शनिवार रोजी तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये प्रवाशांचा हरवलेल्या मौल्यवान वस्तू शोधून त्या सुरक्षितपणे परत केल्या आहेत . प्रवाशांनी RPFच्या तत्परतेचे, प्रामाणिकपणाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले.

50 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप आणि ट्रॉली बॅग प्रवाश्यास केले परत
गाडी क्रमांक १३२०२ पाटणा जनता एक्सप्रेस डाउन (कोच B/3) मध्ये दिनांक ३०.०५.२०२५ रोजी गाडी क्रमांक १३२०२ पाटणा जनता एक्सप्रेस डाउन (कोच B/3) एका प्रवाशाची काळ्या रंगाची बॅग (ASUS कंपनीचा लॅपटॉप – किंमत ₹५०,०००) व स्काय ब्लू रंगाची ट्रॉली बॅग हरवली होती. माहिती मिळताच भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. ५ वर गाडी आल्या वर आरक्षक नरेंद्र गौतम व आरक्षक के. एस. वसावे यांनी कोच अटेंड करून लावारस अवस्थेतील सामान जप्त दुसऱ्या दिवशी अनिरुद्ध गोविंद देशपांडे (वय – ५० वर्षे, रा. औरंगाबाद) हे RPF पोस्ट भुसावळ q आले व ओळखपत्रे व आवश्यक कागदपत्रे सादर करून बॅगची ओळख पटवली. पंचनामा करून त्यांना सामान स्वाधीन करण्यात आले.

महिला प्रवाशाची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली बॅग परत
भाविका राहुल दामगोडे नावाच्या महिला प्रवासी (वय – ३५ वर्षे, रा. ठाणे) चुकून झेलम एक्सप्रेस (११०७७) मध्ये चढल्या होत्या. पुणे स्थानकावर उतरण्याच्या घाईत त्यांचा कपड्यांनी भरलेला बॅग हरवला, ज्यात सोन्याच्या दोन बाळ्या व चेनपट्टी (किंमत सुमारे ₹७०,०००) आणि ₹७२० रोख होते.
भुसावळ स्थानकावर हेड कॉन्स्टेबल संतोष खेडेकर व सीटी अवधेश कुमार यांनी सदर बॅग जनरल कोचमधून शोधून आणला. दिनांक ३१.०५.२०२५ रोजी सदर महिला प्रवासी आरपीएफ कार्यालय, भुसावळ येथे आल्या व पंचांच्या उपस्थितीत बॅगची ओळख पटवून ती त्यांना स्वाधीन करण्यात आली. प्रवाशांनी रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले.

मनमाड स्थानकावर हरवलेला मोबाईल परत
दिनांक ३१.०५.२०२५ रोजी समाधान संतोष महाजन (वय – ३० वर्षे, रा. आडगाव, जळगाव) हे RPF ठाणे, मनमाड येथे आले व त्यांनी सांगितले की त्यांचा Vivo कंपनीचा मोबाईल (मॉडेल १८२४, किंमत ₹१८,०००) प्लॅटफॉर्म क्र. ५/६ वर हरवला आहे.
भुसावळ मंडळातील सुरक्षा बलाच्या टीमने “ऑपरेशन अमानत” अंतर्गत या तीन प्रकरणांत त्वरित कारवाई करून प्रवाशांना त्यांचा मौल्यवान माल परत करून . प्रवाशांनी विभागाच्या कर्तव्यदक्षतेची प्रशंसा करून आभार व्यक्त केले .
.
U


