भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील के. नारखेडे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोविंद मुरलीधर महाजन यांच्यावर जुन 2015 रोजी तांदूळ पोषण आहार संदर्भात अफरातफर केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे कामकाज भुसावळ येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चालले होते. सर्व साक्षीदार व पंच यांची तपासणी, उलट तपासणी घेण्यात आली होती. न्यायालयाला मात्र या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळून न आल्याचे मत नोंदवुन त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

या संदर्भात प्रा. महाजन यांनी भगवान के घर देर है पर अंधेर नही तसेच सत्य परेशान हो सकता है पराजित नही असे मत व्यक्त केले . दहा वर्षानंतर का होईना पण मला न्याय मिळाला. भुसावळ शहरात रसायनशास्त्राचे ते ख्यातनाम शिक्षक आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून देशात व परदेशात त्यांचे विद्यार्थी ऊच्च पदावर कार्यरत आहे. निव्रुत्त झाल्यानंतर सुध्दा त्यांनी आपणास शैक्षणिक क्षेत्रातच गुंतवुन ठेवले.ते भादली येथील रुरल एज्युकेशन सोसायटी चे गत नउ वर्षापासुन ते चेअरमन ची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे.
गुन्हा घडला त्यावेळी त्यांचे नाव यात गोवले गेले असताना अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. परंतु महाजन सर यांनी माझा देवावर विश्वास असून मला न्याय मिळेल अशी भावना व्यक्त केली होती. अखेर यांना न्याय मिळाला. या दहा वर्षात त्यांना बराच मानसिक त्रास झाला, परंतु न्याय मिळाल्याने त्यांच्या परिवारात, मित्रपरिवारात, विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण आहे .त्यांच्या वतीने एडवोकेट सागर चित्रे व एडवोकेट जावेद मेनन यांनी काम पाहिले.


