जळगाव जिल्ह्यातील १९८ प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जळगाव,

जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल यंत्रणेत मोठा बदल करण्यात आला. १९८ अशा मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या.

दि. २६ मे सोमवार रोजी जळगाव जिल्ह्यातील तब्बल १९८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये ५३ सहाय्यक महसूल अधिकारी, ४४ महसूल सहाय्यक (क्लर्क), ३५ मंडलाधिकारी, ५ चालक, आणि ५८ तलाठी यांचा समावेश आहे. तर तलाठी पदावरून तीन जणांची मंडलाधिकारीपदी पदोन्नतीही यावेळी जाहीर करण्यात आली.

This is the last page