नंदुरबार जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने शहादा तालुक्यात मोठ्या नुकसानीचा अंदाज समोर येत आहे. शिवाय काल झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची पडझड झाली आहे. साधारण २०० ते २५० घरांचे यात नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दरम्यान सोनवल गावात घराचा पत्रा उडून लागल्याने पती पत्नी जखमी झाले आहेत.

नंदुरबारमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक ते दीड तास जोरदार पावसाने झोडपुन काढले आहे. यात अनेक घरांचे पत्रे उडाले असून अनेक घरांची मोडतोड देखील झाल्याचं दिसून येत आहे. तर शहादा तालुक्यातील मंदाना, असलोद, सोनवल, काथरदा या गावात अनेक घरांची पडझड झाली असून अवकाळीच्या तडाख्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब देखील पडल्याचे समोर आले आहे. यामुळे वोज पुरवठा खंडित झाला आहे.
काल सायंकाळपासून झालेल्या पावसात शहादा तालुक्यातील ३२८ घरांची अंशतः पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. तर कालच्या पातळी पावसात सोनवल येथे एक गोठा पडून सहा जनावर जखमी झाल्याचं देखील समोर आले आहे. शहादा तालुक्यातील सोनवल गावात घराचा पत्रा उडून एक इसम देखील जखमी झाला असून त्याच्यावरती शहादा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.


