भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे, भुसावळ विभाग अंतर्गत सुरू असलेल्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ७ संशयितांना अटक करण्यात आली असून, विविध चोरीच्या प्रकरणांमध्ये त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भुसावळ स्थानकावर ६ संशयित अटकेत : दिनांक 21 मे 2025 रोजी रेल्वे सुरक्षा बल (RPF) व लोहमार्ग पोलीस (GRP) च्या संयुक्त पथकाने भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन टप्प्यांत मोठी कारवाई करत एकूण ६ संशयितांना अटक केली.
पहिला टप्पा प्लॅटफॉर्म क्र. ५ जवळून अटकेतील संशयित : 1. गिरिजा शंकर बाबूलाल शर्मा (वय 71, नेपानगर) 2. लक्ष्मीनारायण दयाराम बागरी (वय 59, कामलीखेड़ा, उज्जैन) 3. रवि लक्ष्मीनारायण बागरी (वय 25, कामलीखेड़ा, उज्जैन) या तिघांनी 12322 HWH-CSMT मेल एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपी क्र. 1 पूर्वीपासूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. गुन्हा क्र. 213/25, U/S 305 C BNS अंतर्गत दाखल करण्यात आला आहे.
दुसरा टप्पा मुसाफिरखान्यातून अटक : 1. विनोद राधेश्याम बागरी (वय 35, सोनकच्छ, देवास) 2. महेंद्र देवकरण यादव (वय 22, सोनकच्छ, देवास) 3. राजू निम्बा खैरनार (वय 60, नाशिक) पहिल्या दोघांनी 23 एप्रिल 2025 रोजी ट्रेन क्र. 11057 च्या B3 कोचमधून हँडबॅग चोरी केली होती, ज्यात 15,000 रुपये रोख होते. या प्रकरणी गुन्हा क्र. 192/2025 U/S 303(2), 3(5) नुसार नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीवर चॅप्टर केस दाखल करण्यात आली आहे.
जळगाव स्थानकावर मोबाइल चोर पकडला : घटना दिनांक: 23 मे 2025 जळगाव रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. 03 वर ड्युटीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बल (RPF) कर्मचार्यांनी – CT विनोद जेठवे व CT मनोज मौर्य – एक संशयित व्यक्ती पकडली. त्याच्याकडे Vivo कंपनीचा (किंमत: ₹18,000) मोबाईल सापडला.
संशयिताचे नाव : भूषण मछिंद्र सालुंके (वय 34, मेहूनबारे, चाळीसगाव, जि. जळगाव) त्याने सदर मोबाईल प्लॅटफॉर्मवरील प्रवाशाकडून चोरल्याचे कबूल केले असून, त्यातील सिम कार्ड तोडून फेकले होते. सदर प्रकाराची नोंद CR No 220/2025 U/S 120, 122(a) महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत जीआरपी जळगाव येथे करण्यात आली आहे.
सतर्क सुरक्षा यंत्रणांची कामगिरी उल्लेखनीय
भुसावळ व जळगाव स्थानकांवरील RPF व GRP च्या संयुक्त गस्त आणि तत्पर प्रतिसादामुळे सात संशयितांच्या अटकेसह प्रवाशांच्या चोरीप्रकरणी तपासाला चालना मिळाली आहे. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यात मोठे यश मिळाले आहे.


