मद्यप्रेमींना खुषखबर : दोनशे रुपयांची बिअर मिळणार 50 रुपयात !

मुंबई – सरकार बिअरवरील टॅक्स कमी करण्याच्या विचारात आहे. लवकरच दोनशे रुपयांना मिळणारी बिअर आता 50 रुपयात मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाची लहर पसरली आहे.

हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळे बिअर प्रेमींच्या आनंदाला उधाण आले आहे. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेचच चिअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बिअर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

खरंतर भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या 6 मे रोजी एक करार झाला. या कराराअंतर्गत, ब्रिटनमधून भारतात येणार्‍या बीयरवरील कर 150 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांवर आला आहे त्यामुळे 200 रुपयांना मिळणारी बीयर आता 50 ते 70 रुपयांदरम्यान मिळू शकते, असा अंदाज आहे. याचा थेट फायदा बियरप्रेमींना मिळणार आहे.

या कराराचा फायदा केवळ बियरपुरताच मर्यादित नाही. ब्रिटिश स्कॉच व्हिस्कीवरही कर 150 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर आणला गेला आहे. त्यामुळे हाय-एंड स्कॉचची किंमतही लक्षणीय घटण्याची शक्यता आहे. याशिवाय ब्रिटनमधून आयात होणार्‍या कार्स आणि इतर उत्पादनेही यामुळे स्वस्त होतील.