वरणगाव,

शहरातील प्रतिभानगर परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणास पोलीसांनी झडप घालून अटक केली. नवाब शाह युसुफ शाह (वय २० ) असे तरुणाचे नाव असून त्याच्या जवळ सहा बोरवाली काळ्या रंगाची गावठी कट्टा जवळ बाळगत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
या गुप्त माहितीनुसार, वरणगाव पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरिक्षक जर्नाधन खडेराव यांच्या मार्गदर्शनात फैजदार नागेंद्र तायडे , पो कॉ फिरोज खान , पो कॉ वासुदेव सपकाळे यांनी प्रतिभा नगरात जाऊन पाळत ठेवून सदर तरुणाच्या संशयित हलचाली वरून त्याची चौकशी केली असता त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली.यामुळे पोलीसांना त्याची शंका आल्याने त्याच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या जवळून काळ्या रंगाचा एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळताच पोलीसानी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला पो कॉ फिरोज पठाण यांच्या फिर्यादीवरून नवाब शाह विरोधात २०२५ चे शस्त्र अधिनियम ३ / २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागेंद्र तायडे हे करीत आहे.


