भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील काझी प्लॉट परिसरात गुरुवारी सकाळी इकबाल पिंजारी यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली . लागलेल्या आगीत घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून बेचिराख झाले. ही दुर्घटना इकबाल पिंजारी यांच्या नातवाच्या लग्नाच्या दिवशीच घडली .

रजा फरीद पिंजारी याचा विवाह सोहळा गुरुवार रोजी पार पडणार होता. घरात लग्नाचीव पाहुण्यांची लगबग सुरु होती सकाळच्या दरम्यान रजा पिंजारी व त्याचे कुटुंब लग्नासाठी बुलढाणा येथे जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी अचानक शॉर्टसर्किटमुळे घरात आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की क्षणात घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू , टीव्ही, मिक्सर, साउंड सिस्टीम , तसेच विवाहासाठी खरेदी केलेले नवीन कपडे, घरी वापरण्यात येणारे कपडे, पलंग, गाद्या आदी साहित्य जळून खाक झाले. यावेळीपरिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. माजी नगरसेवक शेख पापा यांनी तत्काळ फायर ब्रिगेडला पाचारण केले, ज्यामुळे काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते. घटनेची माहिती त्वरित तहसीलदार व पोलिसांना देण्यात आली . माजी नगरसेवक शेख पापा यांनी तात्काळ पंचनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी प्रशासनाकडे, इकबाल पिंजारी व फरीद पिंजारी यांना शासकीय मदत तातडीने श मिळावी अशी मागणी केली ..
घराला आग लागून झालेल्या संकाटाला धैर्याने इकबाल पिंजारी व कुटुंबातील सदस्यांनी सामोरे जात रजा फरीदचा विवाह सोहळा पार पाडण्याचे ठरवले व वेळेवर बुलढाण्याकडे प्रस्थान केले. या घटनेमुळे संपूर्ण काझी प्लॉट परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


