भुसावळात गंगाराम प्लॉट भागात स्वत:वर गोळी झाडून एकाची आत्महत्या ! –


भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट भागातील एका ५२ वर्षीय इसमाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, गंगाराम प्लॉटमधील नमस्कार मंडळाच्या मागील भागातील रहिवासी व्यवसायाने चालक होते व हल्ल्ी शहरातील ट्रॅव्हल्समध्ये वाहनांच्या मेन्टनन्सचे काम पाहणारे डिगंबर बढे ( वय ५२ ) यांनी आज सोमवार रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. माजी नगरसेवक नितीन धांडे यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सहकार्‍यांनी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.