ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ स्पोर्ट्स ग्राउंड वर जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा संपन्न ;

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्त
3 व 4 मे 2025 रोजी दोन दिवसीय जिल्हा स्तरीय बॉक्सिंग स्पर्धा बौद्ध मंडळ ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ आणि निलेश बॉक्सिंग फिटनेस क्लब पुणे यांनी बॉक्सिंग प्रतियोगिता आयोजित केली होती

03 मे रोजी निरंजन लाल,कार्यकारी निदेशक ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ यांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, कार्यक्रमाचे उद्घाटन केलेयावेळी प्रमुख, अतिथी श्रीमती शोभाना शर्मा. यंत्र महिला कल्याण समिती, ऑर्डनन्स फॅक्टरी भुसवळ शाखा. यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरवात केली.
4 मे, 2025 रोजी अंतिम बॉक्सिंग स्पर्धा झाली. स्पर्धेत विजेत्या, सर्व बॉक्सरला , श्री. निरंजन लाल आणि श्रीमती. शोभना शर्मा, यांच्या हस्ते विजय ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.


यावेळी संयुक्त महाप्रबंधक. अभय गोगाटे,
पी.एम.श्री.केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य डी.एस. नंदेश्वर आणि एच. एम.सुरेश नरहिरे व यंत्र महिला कल्याण समिती ऑर्डीनन्स फॅक्टरी भुसावळ शाखा ची पदाधिकारी महिला ,
सर्व अधिकारी कर्मचारी सर्व युनियन, असोसिएशनचे पदाधिकारी,
कार्य समिती सदस्य ,जे.सी.एम सदस्य आणि सर्व मंडळांची पदाधिकारी, क्रीडा समिती पदाधिकारी,
समस्त बौद्ध मंडळ पदाधिकारी सभासद ,
तरुण मंडळ, महिला मंडळ, सर्व बॉक्सिंग प्रेमी, प्रशिक्षक, खेळ न्यायाधीश, बॉक्सिंग स्पर्धक उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऑर्डिनेंस फॅक्टरी भुसावळ मधील सर्व अनुभागांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले व
निलेश बॉक्सिंग फिटनेस क्लब पुणे आणि त्याचे सहकारी , सर्व कार्यकर्त्यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रम यशस्वीते साठीबौद्ध मंडळा चे अध्यक्ष प्रकाश वानखेड़े , महासचिव एम.एस.राऊत ,कैशियर संजय आहिरे, वर्किंग प्रेसिडेंट रमेश सुरवाडे, उपाध्यक्ष एस.टी.तायडे, हरीश इंगळे ,
आकाश सपकाळे , प्रवीण पाटील, प्रवीण मोरे ,गणेश मोरे , वीरेंद्र मोरे , यश वानखेडे, स्नेहल राऊत,सपन सोलंकी, निशांत राठोड, संतोष आव्हाड, अश्वजीत लोखंडे,सुमित रंधे, निलेश मेश्राम,आनंद मेश्राम, आदित्य मेश्राम,ब्रायन सँडस, बॉबी पवार ,मन्ना घारू,
सर्वांनी परिश्रम घेतले.