भुसावळ – येथील बियाणी ज्युनिअर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मधील विद्यार्थी विद्यार्थिनींनी दर वर्षाप्रमाणे यंदाही यशाची परंपरा कायम ठेवत भरघोस यश संपादन केले आहे. इयत्ता बारावी सायन्स मधील प्रथम आलेली विद्यार्थिनी हिवराळे नंदिनी मनोहर 89.67%, द्वितीय क्रमांक: शेख आफरीन हनीफ 89.50% , तृतीय क्रमांक: पाटील प्रांजल मंगेश 89% मार्क्स मिळवून यशाचे शिखर गाठले आहे.
तसेच वाणिज्य शाखेतील प्रथम क्रमांक: विद्यार्थिनी अनाज वाला शिरीन फिरोज हुसेन 77.17%, द्वितीय क्रमांक: सोनवणे प्रेरणा प्रदीप 74.17% , तृतीय क्रमांक पाटील निर्मल प्रवीण: 73.50%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मनोज बियाणी, डॉ.संगीता बियाणी, प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया यांनी करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



