जळगाव –
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने १ मे कामगार दिनानिमित्त सकाळी ठीक ९.०० वाजता हनुमान मंदिर दाणा बाजार येथे ५० कष्टकरी हमाल बांधवांचा पुष्पगुच्छ व टी शर्ट देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनीषा पाटील यांनी कामगार बांधव सतत वर्षभर कष्टाचे काम करून स्वतःचा कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात परंतु त्यांची प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ मे हा कामगार दिन अतिशय सुंदर औचित्य साधून नारीशक्तीने कष्टकरी कामगारांचा सन्मान केला आहे .याप्रसंगी चंद्रशेखर नेवे अध्यक्ष सौ मनिषा पाटील, अध्यक्ष शेषराव वलकर, उपाध्यक्ष सुभाष काळभोर, सचिव संजय कदम,आशा मौर्य, वंदना मंडावरे, किमया पाटील,रेणुका हिंगु, नेहा जगताप ,माधुरी शिंपी कांचन पाटील, श्रावणी पाटील, अथर्व पाटील व कामगार बंधू उपस्थित होते.



