प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना एवं महिला अपराध नियंत्रण संघटनेचे राज्याध्यक्ष शशिकांत दुसाने यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर येथे रुग्णांना फळवाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटना एवं महिला अपराध नियंत्रण संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीयुत शशिकांत दुसाने यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुका शाखा विभाग जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे, भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा , भुसावळ शहर अध्यक्ष जयप्रकाश शुक्ला , महिला संघटक आशा पाटील , सुष्मिता कोल्हेकर, कल्पना सोनवणे यांच्या उपस्थितीत ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील ऍडमिट पेशंटला फळ वाटप करून साजरा करण्यात आला

यावेळी रुग्णालयाचे डॉ. सरोदे , डॉ. कुरकुरे, फार्मासिस्ट चेतन भालेराव व परिचारिका स्टाफ उपस्थितीत होते. तसेच आज 1 मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस निमित्ताने सर्व स्टाफचा पुष्प देऊन सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या