| भुसावळ (प्रतिनिधी ) –
सकल ब्राह्मण समाजाच्या श्री. भगवान परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये पुणे येथील व्याख्याते अभिजीत मुंडे यांचे शंभु गाथा या विषयावर व्याख्यान होईल. तर मंगळवारी होणारी मिरवणूक यंदा पहलगाममधील बॅसरन खोऱ्यात झालेल्या दहशतीवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर साधेपणाने काढली जाईल. उत्सव समितीतर्फे दरवर्षी मुंबई किंवा पुण्यातील ढोलपथक मागवले जाते, यंदा मात्र ढोलपथक रद्द करण्यात आले आहे.

भगवान श्री. परशुराम जन्मोत्सवानिमित्ताने तीन दिवसीय कार्यक्रमांना रविवारपासून सुरवात झाली. या कार्यक्रमांमध्ये सोमवारी (दि. २८) सायंकाळी सहा वाजता प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलमध्ये पुणे येथील व्याख्याते अभिजीत मुंडे यांचे शंभु गाथा या विषयावर व्याख्यान होईल. तर २९ रोजी सायंकाळी सहा वाजता अष्टभुजा मंदिरापासून शोभायात्रा निघेल. या शोभायात्रेत दरवर्षी मुंबई किंवा पुण्यातील ढोल पथक मागविण्यात येते. हे ढोल पथक शहरासाठी आकर्षण ठरते. यंदा मात्र पेहलगाम येथे झालेल्या दहशतीवादी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर हे नियोजन रद्द करण्यात आले आहे. परंपरेनुसार साधेपणाने मिरवणूक काढली जाणार आहे. असे समितीने कळवले आहे.


