भुसावळात अलायन्स मराठी चर्च येथे वधू वर मेळावा संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील अलायन्स मराठी चर्च येथे प्रीती वधू वर सूचक केंद्र व अलायन्स मराठी चर्च भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व खानदेशातील चर्चमध्ये झालेला दुसरा व संस्थेचा 46 वा वधु वर परिचय मेळावा दिनांक 26 एप्रिल या रोजी संपन्न झाला श.याचे उद्घाटन अलायन्स मराठी चर्च चे पंचमंडळ त्यांच्या हस्ते झाले. एकूण 26 जणांनी आपली नाव नोंदणी या परिचय मेळाव्यास दर्शविली याचे प्रमुख पाहुणे म्हणून सेंट पॉल स्कूलचे फौंडर डायरेक्टर मिस्टर समीर शेफर्ड सर तसेच सेंट पॉल चर्च चे प्रमुख आचार्य रेव्ह. किशोर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाचे आयोजक रेव्ह. प्रकाश ढगे सर यांनी या मेळाव्याचा उद्देश व महत्त्व समोर सांगितले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेव्ह स्वप्निल नाशिककर यांनी सध्या परिस्थितीमध्ये कुटुंबांची व तरुण मुलांची विवाह बद्दल असणारी मानसिकता व त्याचे गंभीर परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. मि. समीर शेफर्ड सर यांनी शिक्षण व वैवाहिक जीवन याचा समतोल कसा राखावा याविषयी मार्गदर्शन केले व रेव्ह किशोर गायकवाड सर यांनी योग्य वयात वैवाहिक होण्याचे निर्णय व एकत्र कुटुंब पद्धत किती मोलाची आहे याबद्दल मार्गदर्शन केले.

या मेळाव्यास बऱ्हाणपूर खंडवा चाळीसगाव जळगाव छत्रपती.संभाजी नगर, चिखली बुलढाणा इतर ठिकाणाहून अनेकांनी हजेरी लावली. मेळाव्याच्या पूर्वार्धात पालकांना व मुलांना मार्गदर्शन करण्यात आले व उत्तरार्धात आलेल्या प्रतिनिधींचे त्यांना समोर बोलावून त्यांचे माहितीपत्रकाचे वाचन करण्यात आले.मेळाव्याची सांगता पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बेधुंद गोळीबारामध्ये जे निष्पाप पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व त्या प्रत्येक दुःखीतासाठी परिवारासाठी सांत्वनाची प्रार्थना माननीय रेव्ह. किशोर गायकवाड यांनी सादर केली व प्रार्थना करून आशीर्वाद घेऊन मेळाव्याची सांगता करण्यात आली.
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी मिस्टर प्रविण ओहोळ,फिलीप फ्रान्सिस,जया फ्रान्सिस मनी,मि सॅमसन गायकवाड, गॅब्रियल थिओपीलस, जेसन मकासरे ,अमोल जाधव सायमन गायकवाड,नोएल थिओफिलस, सौ.रुपाली नाशिककर,सौ.संगिता गायकवाड. सौ विणा थिओफिलस, यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन रेव्ह. स्वप्निल नाशिककर यांनी केले