भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून अनेकांची आथिर्क फसवणूक केल्याप्रकरणी प्रशांत अग्रवाल सह चार साथीदारांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील तीन संशयित फरारी आहे.प्रशांत अग्रवाल व योगेश तिवारी असे संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी वसंत जानबाजी ढोणे सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहणार मुरलीधर सोसायटी घर नंबर १६ जुना तोल नाका,टाटा मोटर्स,फेकरी यांचे मुलास नोकरीस लावून देण्याचे उद्देशाने पैसे घेवून फसवणूक केल्याने संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यांच्या विरुद्ध ता २१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी खाकी दाखवितात संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विजयकांता सुरेंद्र मुनोद ऊर्फे मेहता मॅडम राहणार पन्नाभवन, वरणगांव रोड गो गॅस पंपाचे शेजारी, शिवाजी नगर,योगेश केशव प्रसाद तिवारी राहणार रिंग रोड फालक नगर गणेश मंदिर जवळ भुसावळ, मुन्ना मोहन परदेशी राहणार फिल्टर हाऊस रोड कवाडे नगर भुसावळ, मेघराज सिंग नारायण सिंग पाटील राहणार साकरी तालुका भुसावळ अशांनी नावे सांगितली.
पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास ता.२१ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता ता.२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली होती.कोठडी संपल्याने
पोलिसांनी संशयित आरोपी अग्रवाल यास ता.२५ रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.तर महिला बाल संगोपन केंद्राचे लीडर संशयित आरोपी योगेश केशव प्रसाद तिवारी यास ता.२५ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अटक केली असून गुन्ह्यातील उर्वरित तिघे संशयित आरोपी फरारी आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पो उप निरीक्षण मंगेश बेंडकोळी सह योगेश महाजन,जीवन कापडे करीत आहे. आद्यपावतो २५,६८,४०६ रुपये संशयित आरोपींकडून पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.जळगांव,नंदुरबार,बुलढाणा येथील अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.


