भुसावळ (प्र्रतिनिधी ) – सुखकर व आरामदायी व्हावा म्हणून महिलांसाठी विशेष डबे रेल्वे गाड्यांना जोडण्यात आले आहे मात्र महिलांसाठी आरक्षीत असलेल्या या डब्यांमध्ये पुरूष प्रवासी घुसखोरी करीत असल्याने अशाविरोधात भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाचे रेल्वे स्थानक प्रमुख पी.आर.मीना यांच्या नेतृत्वात विशेष मोहिम उघडण्यात आली आहे. सोमवार, 21 रोजी पहिल्याच दिवशी शंभरावर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने प्रवाशांच्या गोटात भीती पसरली आहे. कारवाईचा धडाका असाच सुरू राहणार असल्याचे आरपीएफ निरीक्षक मीना म्हणाले
सोमवार, 21 एप्रिल रोजी भुसावळ स्थानकावर महाराष्ट्र एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, तापी गंगा, काशी एक्स्प्रेस, सुरत-अमरावती, नवजीवन एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने कारवाई केली. सोमवारी दिवसभरा 103 हून अधिक प्रवाशांवर कारवाई करण्यात आली तर न्यायालयाने प्रत्येकी प्रवासी 300 रुपयांचा दंड या प्रवाशांना सुनावल्याने प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली.



