भुसावळ (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण निवारण मंडळावतीने उन्हाळ्याची तीव्रता बघता.“पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत परळ वाटप करण्यात आले .

दिनांक 23 एप्रील गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता कृष्णचंद्र हॉलच्या बाजुला बसारा रनिंग गृप यांच्या सोबत या ठिकाणी परळ वाटप डॉ कामिनी तिवारी दुबे यांच्या हस्ते करण्यात आले.
गृप चे वैशिष्टे असे की ज्याला खरच पर्यावरणाची आवड आहे याची खरच खात्री असते अशा वेगवेगळ्या गृप ला जाऊन परळ वाटप करतो आणि पर्यावरणा ला आपला थोडासा हातभार असे आवाहन डॉ सौ कामीनी तिवारी दुबे यांनी केले सामाजिक कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष निसर्ग व सामाजीक पर्यावरण मंडळ प्रदुषण मंडळ सौ स्वाती भोळे( जिल्हा अध्यक्ष बहिणाई ब्रिगेड) खजीनदार सौ विजया निकम पर्यावरण सरस्य सौ डॉ निलीमा नेहते सौ डॉ चारूलता पाटील , सौ स्वाती फालक,सौ मंगला पाटील सौ मेघा कुरकुरे सौ भारती चव्हाण , किर्ती मोताळकर, संगीता चौधरी, मनिषा सिंग, सोना, सिंग, वैशाली पाटिल, गरिमा न्याती , मंजुषा कुलकर्णी , सौ माधुरी या सर्वांचे सहकार्य लाभले तसेच सौ प्रभा पाटील यांनी पण आपल्याला 11 परळचा निधी दिलेला आहे यशस्वितेसासाठी जिल्हा अध्यक्ष सौ स्वाती भोळे व संपूर्ण पर्यावरण टीम भुसावl यांनी परिश्रम घेतले .



