चैन चोरी : भुसावळ शहरातून दोन संशयित महिला ताब्यात –


भुसावळ – शहरातील खडका रोड भागातील,रजा टॉवर,इराणी मोहल्ला परिसरातील दोन संशयित महिलांना अमळनेर पोलिसांनी चैन चोरीच्या गुन्ह्यात चौकशी कामी भुसावळ शहरातून ताब्यात घेतले.

अमळनेर पोलीस स्टेशनला चैन स्कॅनचिंगचा गुन्हा दाखल आहे.गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक ही करण्यात असून त्यांच्याकडून बराचसा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. मात्र संशयित आरोपींनी उरलेले मुद्देमाल भुसावळ शहरातील इराणी मोहल्ला भागातील महिलांना विक्री केल्याची माहिती दिल्याने अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी बाजारपेठ पोलीस स्टेशनला सकाळचे आठ वाजेचे पासून

ठाम मांडून होते.बाजारपेठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने दोन संशयित इराणी महिलांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले असून दोघे महिलांना अमळनेर पोलीस स्टेशनला नेण्यात आले.