निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेला सांघिक सामाजिक जबाबदारी निधीतून संरक्षण भिंत

निंभोरा, (वा ) – आज निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळेला महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितच्या सांघिक सामाजिक जबाबदारी (सी. एस. आर.) निधीतून शाळेच्या संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले.

या समारंभात निंभोरा गावच्या सरपंच रोहिणी कोलते, तसेच ग्रामपंचायत सदस्य उल्हास बोरोले, यासिन पठाण, सनी चाहेल, आणि फेकरी गावच्या सरपंच व भाजप तालुका अध्यक्षा चेतना भिरुड यांच्यासह ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक बंटी कोलते, कुणाल सुरडकर, उमेश मठकरी, संतोष तांबे, प्रकाश सरदार, प्रभाकर साळवे, मीरा मोरे, भाजपा तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, संजय भिरुड, प्रशांत निकम, सौरवकुमार सरदार,दिलीप तायडे, आणि भावेश चौधरी यांसह अनेक नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

उद्घाटन कार्यक्रमाची सूत्रसंचलन व आभार प्रदर्शनाची कर्तव्ये संजय भारंबे यांनी पार पडली. त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना याबद्दल माहिती दिली की, या कंपाऊंड भिंतीमुळे शाळेच्या सुरक्षेत मोठा सुधारणा होईल आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उत्तम वातावरण तयार होईल.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून निंभोरा गावातील शाळेला मिळालेली या निधीची मदत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक पाऊल पुढे आहे, हे मनाशी ठरवले आहे, अशी भावना सर्व उपस्थितांनी व्यक्त केली.

संपूर्ण गावासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याने, उपस्थितांनी आनंद व्यक्त करत शब्द दिला की, भविष्यात पाहिजे असलेल्या इतर विकासकामांसाठी त्यांनी एकत्र येऊन त्यास हातभार लावला पाहिजे.