गोशाळा महासंघ जिल्हाध्यक्ष यांची स्वप्निल स्मृती गोकुळ ग्रामला सदिच्छा भेट

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या कुऱ्हा पानाचे येथील ललवानी फाउंडेशन संचलित स्व. स्वप्निल स्मृती गोकुल ग्राम एवं अनुसंधान केंद्र या गोशाळेला गोशाला महासंघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. बन्सीलाल जैन(दुगड) यांनी भेट देऊन सर्व परिसराची पाहणी केली. त्यांनी सर्व गाईंची सुद्धा आस्थेवाईकपणे चौकशी करून काही काळ तेथे व्यतीत केला .

गो शाळेच्या या प्रोजेक्टला भेट दिल्यानंतर त्यांनी सुसज्जतेबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच गोशाला अतिथी गृह ,पंचवटी,बांबु हाउस,सर्व्हंट क्वार्टर. साधू साध्वी विहारधाम, मुलांसाठी असलेल्या खेळ, तसेच आंबा ,नारळ, लिंबू, पेरू या बागेला सुद्धा भेट देऊन सर्वत्र असलेल्या नैसर्गिक हिरवळीबद्दल, मन प्रसन्न करणारा परिसर असे त्यांनी गौरवद्गार काढले .या ठिकाणी आयुर्वेद पंचगव्य चिकित्सा केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून गाईच्या गोमूत्रापासून व शेण पासून विविध प्रॉडक्ट बनवण्याची सूचना केली . संस्था कशी स्वावलंबी होईल याबद्दलही मार्गदर्शन केले .याप्रसंगी गोसेवा करणारे सोपानभाऊ डामरे, महेश जगताप, अप्पा जगताप ,सखाराम बारेला, संदीप पाटील, सौ गायत्री जगताप यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली . ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डाँ.डि.एम.ललवाणी यांनी निव्रुत्ती नंतर वास्तविक आराम न करता मुलाच्या स्म्रुती प्रित्यर्थ गोसेवा व भुमातेच्या सेवेचे व्रत अंगीकारल्याबद्यल त्यांनी ललवाणी यांचे विशेष कौतुक करुन सहकार्याचे आश्वासन दिले. प्रा. ललवाणी यांनी जिल्हाध्यक्षांनी भेट दिल्याबद्दल सूचना व मार्गदर्शन केल्याबद्दल आभार व्यक्त केले.