भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे महिला मंडळ विभाग भुसावळ यांच्या वतीने भोरगाव लेवा आयडॉल (गायन स्पर्धा) प्रभाकर हॉल, भुसावळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये बाल गट,पुरूष सोलो , महिला सोलो आणि ड्युएट या प्रत्येक गटातून तीन विजेते घोषित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल हरिभाऊ जावळे व डॉ. केतकी उल्हास पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन वर्षा लोखंडे आणि आभार प्रदर्शन डॉ. मृणाल पाटील यांनी केले. यावेळी भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे येथील सर्व सभासदही उपस्थित होते.
कार्याध्यक्षा मृणाल पाटील यांनी भोरगाव महिला लेवा मंडळ चा हा पहिलाच कार्यक्रम असल्याचे व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. तसेच यापुढेही अनेक समाज उपयोगी प्रकल्प करणार असल्याचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले.
उपाध्यक्ष डॉ. संज्योत पाटील यांनी भुसावळच्या पाणी प्रश्नावर उपाय म्हणून शोषखड्डया विषयी माहिती दिली व पुढचा प्रोजेक्ट शोषखड्डा करणार असल्याचे जाहीर केले. भुसावळकरांसाठी हा अत्यंत फायदेशीर प्रोजेक्ट असून काल जाहीर करता बरोबर अनेकांनी नावनोंदणी केली.
महिला मंडळाच्या अध्यक्षा कल्पना महेश फालक, कार्याध्यक्ष डॉ. मृणाल चेतन पाटील, उपाध्यक्षा प्राची राणे, कोषाध्यक्ष मोना पंकज भंगाळे, सहकोषाध्यक्ष वैशाली किरण महाजन,दिपाली परिक्षीत ब-हाटे , डॉ. संज्योत पाटिल, सचिव स्वाती चौधरी, सहसचिव किरण सुनील जावळे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या आयोजनात आरती चौधरी, मंगला पाटील, कावेरी चौधरी, संध्या वराडे, सुभाष भंगाळे व सुहास चौधरी अध्यक्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच चेतन पाटील यांनी मदत केली. या
कार्यक्रमासाठी भुसावळ परिसरात शिवाय अकोला औरंगाबाद मलकापूर मुंबई येथूनही स्पर्धक उपस्थित होते
स्पर्धेचे विजेते खालील प्रमाणे
किशोर गट (Teens Group):
१. ऐश्वर्या एस. पाटील
२. तनुश्री भोळे
३. राशी पाटील
४. योगेश राणे
५. मानस गोपाळ पाटील
पुरुष खुला गट (Male Open Group):
१. डॉ. अनंत बेंडाळे
२. गोपाळ पाटील
३. किशोर पाटील
४. दीपक ढांडे
५. डॉ. दिनेश नेहेते
महिला खुला गट (Female Open Group):
१. कीर्ती पाटील
२. डॉ. जान्हवी पाटील
३. डॉ. सुजाता खरचे
४. डॉ. छाया चौधरी
५. वर्षा पाटील
६. सीमा चौधरी
युगल गट (Duet Group):
१. डॉ. जान्हवी पाटील आणि डॉ. अनंत बेंडाळे
२. नम्रता नेहेते आणि पुनम पाटील
३. डॉ. दिनेश नेहेते आणि डॉ. देवयानी नेहेते



