भुसावळात स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवात उखाणे व वेशभूषा स्पर्धा ;

स्पर्धा ११ एप्रिलला, विजेत्यांना पारिताेषिके देऊन गाैरवणार

भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे यंदा चैत्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आहे आहे. नाभिक संघाच्या सभागृहात ११ एप्रिल राेजी हा कार्यक्रम हाेईल. त्यात उखाणे, पारंपरीक वेशभूषा स्पर्धा हाेईल. त्यातील विजेत्यांना राेख पारिताेषिके देऊन गाैरवण्यात येणार आहे.
महिलांच्या कलागुणांना अधिक वाव मिळावा म्हणून चैत्रनिमित्त हळदीकुंकू, उखाणे, स्पर्धा पारंपारिक वेशभूषा, लकी ड्रॉ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पारंपरिक वेशभूषेसाठी प्रथम बक्षीस ५०१, द्वितीय २५१, तृतीय १५१ रुपये आहे. उखाणे स्पर्धा ही पर्यावरणावर आधारीत आहेत. निसर्गाप्रती प्रेम निर्माण व्हावे, पर्यावरण चळवळीला बळ मिळावे हा स्पर्धेमागील उद्देश आहे. या धमाल मौजमस्तीचा आनंद घेण्यासाठी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वामिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियंका चाैधरी, उपाध्यक्ष विजया निकम, सचिव उज्ज्वला बागुल यांनी केले आहे.