भुसावळ ( प्रतिनिधी ) – उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वात पहिले आठवण होते ती ” भुसावळ शहराची “, मागिल अनेक वर्षांपासून भुसावळ शहराच्या तापमानाची राज्यात सर्वाधिक तापमान म्हणून नोंद झाली आहे. या विक्रमी नोंदिमुळे यंदाही तापमान वाढून कडक उन्हाळा जाणवेल कि काय अशी सर्वाना भीती वाटत आहे . मात्र मागील पंधरवाड्यात अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व गारांमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मार्च महिना सुरु होऊन सुद्धा गारठा जाणवत होता शहरात सध्या विचित्र वातावरणाचा अनुभव शहरवासियांना घेतला मात्र एप्रिल च्या पहिल्या आठवड्यापासून शहराच्या तापमानाने चाळीसीकडे आपली वाटचाल सुरु केली आहे . रात्री गारठा तर दिवसा कडक उन्हाचे चटके जाणवत आहे.
गेल्या आठवड्या पासून तापमानात हळूहळू वाढ होत चाललि आहे तापमान आजही कायम आहे आद्रता ६७% पर्यंत पोहचल्याने उकाड्यात वाढ झाली आहे या वाढलेल्या तापमानामुळे नागरिक घामाघूम होत आहे. मागील चार पाच वर्षापासून शहराचे तापमान ४७ -४८ अंश अशी विक्रमी नोंद कायम होत असते २००९ मध्ये ४८.५ अशी राज्यात विक्रमी नोंद झालेली आहे. यंदाही तापमान अशीच वाढ होत राहिली तर पुन्हा हे शहर तापमानाचा उचांक मोडेल कि काय अशी भीती शहर व परिसरातील नागरिकांना वाटू लागली आहे. कारण भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पातून वीज निर्मिती वाढल्याने तसेच जास्त वृक्षतोड झाल्याने सुद्धा तापमानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही
. शहराच्या वाढत्या तपमानापासून स्वरक्षणासाठी नागरिक खबरदारी म्हणून डोक्यास रुमाल डोळ्यांना गारवा मिळावा यासाठी गॉगल्स, कॅप, बागायती रुमाल यांचा वापर करताना दिसून येत आहे तर तरुणी स्कार्फ व सनकोट चा वापर करीत आहे बाजारात कुलर, वातानुकुलीत यंत्र(ए.सी), पंखे ,वाळ्याच्या ताट्या ,थंडगार पाण्यासाठी वाळा , खस ,विवीध रंगबेरंगी सरबत प्रकार,आदी उन्हापासून गारवा देणाऱ्या वस्तू बाजारात विक्रीस उपलब्ध झाल्या असून नागरिकांचा या विविध वस्तू खरेदीकडे कल वाढताना दिसून येत आहे.
नुकत्याच परीक्षा संपत असल्याने युवावर्गाची गर्दी शहरातील विविध आईस्क्रिम पार्लर ,रसवंती,बर्फाचा रंगिबेरंगी गारेगार गोळा विक्रेत्यांच्या गाडीवर ,मावा कुल्फी ,कोल्ड्रिंक सेंटर ,आदी ठिकाणी दिसत दिसत आहे. तर बाजारात संत्री ,द्राक्ष ,टरबूज, खरबूज,काकडी,या गारवा देणाऱ्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्याचे दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी कोल्ड्रिंक आईसस्क्रीम सेंटर बरोबर ऊसाचा रसाची दुकाने थाटली आहे .अनेक लहानमोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानांना हिरव्या रंगाच्या कापडाचे शेड बांधले तर अनेकांनी दुकानासमोरील रस्त्यावरहिरवे कापड बांधून ग्राहकांची सोय केली आहे.
गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारा काळा माठ व रांजनाची मागणी वाढली असून सुमारे १०० रुपयांपासून ते ४०० रुपयांपर्यंत उपलब्ध झाले आहेत. वाढत्या उन्हाच्या चटके जाणवू लागल्याने दुपारी बारा वाजेपासूनच रस्ते ओस पडू लागले तर सायंकाळी सहा नंतर पुन्हा रस्त्यांवर गजबजू लागत आहे. शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ,संध्याकाळी आबालवृद्ध गर्दी करू लागले आहे. शहर व परिसरातील या वाढत्या तापमानामुळे एप्रिल ,व मे कोणता उच्चांक मोडून काढणार व नागरिकांना उन्हाबरोबरच पाणी टंचाई सारख्या अन्य समस्यांना सामोरी जावे लागेल कि काय अशी भीती वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसाची तापमानाची नोंद अशी—– तारीख किमान कमाल १ एप्रिल. २६.८ ३९.५ २ एप्रिल. २५.६ ३६.१ ३ एप्रिल. २४.१ ४१.० ४ एप्रिल. २३.८ ४०.८ ५ एप्रिल. २१.५ ४२ .७ ६ एप्रिल. २१.८ ४४.३ ७ एप्रिल. २२.१ ४५.२ केंद्रीय जल आयोग कार्यालयाच्या नोंदीनुसार भुसावळला ७ एप्रिलला कमाल ४५.२ अंश तर किमान २२.१ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. रविवारी भुसावळात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च ४४.३ अंश तापमानाची नोंद झाली होती. पण, अवघ्या २४ तासांत हा रेकॉर्ड मोडीत निघाला. सोमवारी शहराचे कमाल तापमान तब्बल ४५.२ अंश, तर किमान तापमान २२.१अंशांवर पोहोचले.सकाळी १० वाजेपासून दिवसभर भुसावळकरांच्या अंगाची लाही लाही झाली गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरणामुळे उष्णतेपासून भुसावळकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या दोन तीन दिवसापासून तापमानात वाढ होत असून,यामुळे उष्णतेपासून जळगावकर होरपळला आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस शहराच्या तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात येत आहे. राजस्थान, मध्यप्रदेश मार्गे उष्ण वारे वाहत आहेत. त्यातच हवामान कोरडे असल्याने उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत. वातावरणात बाष्पाचे प्रमाण आता कमी झाले आहे. त्यात उष्ण लहरींमुळे तापमानाचा पारा अधिकच वाढला आहे. . या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद सोमवारी करण्यात आली आहे



