भुसावळ शहरात पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला; दोघा आरोपींना अटक :

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील खडका रोडवरील कब्रस्थानच्या गेट समोर दोन इसमांनी पूर्ववैमनस्यातून एकावर चाकूने मानेवर व पाठीवर सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना ईद च्या दिवशी दि.31 मार्च रोजी नमाज पठणानंतर घडली .या प्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने दोघां आरोपींना जेरबंद केले आहे.

खडका रोड भागातील इदगाह येथे मुस्लिम समाज बांधब ‘रमजान ईद सणा’निमित्त मोठ्या संख्याने एकत्र येऊन नमाज पठण करतात. यानंतर कब्रस्थान मध्ये जाऊन पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करतात . याअनुषंगाने पापा नगर भागातील गैसिया नगर कब्रस्थान येथे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी. रिजवान शेख रहीम हा युवक साडे दहा वाजेला श्रद्धांजलीसाठी कब्रस्थान मध्ये आल्याची माहिती मुख्य आरोपी दानिश माया ऊर्फे अकिल शेख (वय-19) तसेच जकीरीया ऊर्फे बाबा शेख जुनेस गैस (वय-24) या दोघांना मिळाली. कब्रस्थानच्या गेट बाहेर दोघे पाळत ठेवून होते. रिजवान गेट समोर येताच दोघांनी त्याच्या मानेवर व पाठीवर चाकूने वार करून जबर जखमी केले. यावेळी रिजवान रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णवाहिकेतून जखमीला ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटरला येथे प्राथमिक उपचार करून जळगांव येथे खाजगी रुग्णालयात हलविले. चाकूने वार केल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाला होता. जखमी रिजवानची प्रकृती गंभीर असून पोनि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई …..

भुसावळ शहर पोलिस गुन्हे शाखेचे पोलीस सचिन पोळ, गोपाल गव्हाळे, कमलाकर बागुल, गजानन देशमुख, विजय नेरकर, योगेश माळी, महेश चौधरी, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, प्रशांत सोनार, अमर आढाळे, भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करून यातील दोघां आरोपींना घटनेच्या एक तासात अटक करून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

अशी आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी

शहरातील जाम मोहल्ला भागातील शालिमार हॉटेल जवळील डी.डी.सुपर कोल्ड्रिंक्स अँण्ड टी हाऊस दुकानांमध्ये तैरींम अहमद व नासिर अहमद ऊर्फे मस्तान शेख दोघे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास चहा पित असतांना पाच ते सहा इसमांनी बंदुकीने गोळ्या झाडून खून केल्याची घटना 10 जानेवारी 2025 रोजी घडली होती यात . तैहरींम अहमद ऊर्फ मस्तान शेख याची हत्या करण्यात आली होती. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवरच हा हल्ला झाला असावा अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे , याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.