नृत्याच्या जल्लोषात साजरी झाली गुढीपाडवा पहाट; नुपूर कथक डान्स अँकॅडमीचा स्तुत्य उपक्रम ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
दरवर्षी प्रमाणे यंदाही नृत्य आराधना या शास्त्रीय व उपशास्त्रीय नृत्याच्या कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नुपूर कथक डान्स अँकॅडमी भुसावळ, गायत्री शक्तिपीठ, भुसावळ आणि संत गजानन महाराज फाउंडेशन भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नृत्यशिक्षिका चारू भालेराव आणि सगळ्यात लहान कलावंतांच्या हस्ते चार वेदांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

प्रथम प्रणम्य शिरसा देव या गीतावर हेतल फेगडे, भक्ती उके, वीरा सोनवणे यांनी नृत्य सादर केले. नंतर शंकर भंडार बोले या गीतावर किमया भंडारी, देवकी नाईक, एकता वाणी यांनी नृत्य सादर केले. नंतर प्रणवी उपाध्याय आणि अश्वती सपकाळ यांनी जयजयवंती रागातील तराना प्रकार सादर केला. तर नुपूर भालेराव हिने राम भजन सादर करून वातावरण निर्मिती केली. नंतर गीता नारखेडे व गौरी पाटील यांनी गुढी पाडव्याच्या गीतावर नृत्य सादर केले. नृत्यशिक्षिका चारू भालेराव यांनी रूपक तालातील राम भजन नृत्यातून सादर केले.

नुपूर भालेराव, डिंपल गाढे, लतिका श्रीखंडे यांनी कथक नृत्य सादर केले नंतर मंजु शर्मा आणि प्रीती सोनवणे यांनी शिवस्तुती वर नृत्य सादर केले. या नंतर साक्षी कुलकर्णी आणि डिंपल गाढे यांनी शिव धृपद नृत्यातून सादर केले. वंदन हो या गीतावर स्वरा हेडा, अश्वती सपकाळ, प्रणवी उपाध्याय, आस्था पाटील यांनी नृत्य सादर केले. तर नुपूर भालेराव हिने कथक नृत्य करताना तोडे,तुकडे सोळा चक्कर भ्रमरी असे प्रकार सादर केले. गीता नारखेडे, गौरी पाटील, हर्षदा साळी यांनी राम भजन नृत्यातून सादर केले.

गायत्री शक्तिपीठ येथे सकाळी झालेल्या कार्यक्रमात रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले. कार्यक्रमानंतर प्रग्यापेय चा प्रसाद वितरित करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमाकांत भालेराव, किरण फलक, भास्कर नारखेडे,राजेंद्र जावळे, हरीश कोल्हे गायत्री शक्तिपीठ परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.