भुसावळात जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी जय संताजी महिला मंडळा तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर ;

.भुसावळ (प्रतिनिधी ) – दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त जय संताजी महिला मंडळ ,भुसावळ यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने समस्त तेली समाजातील जेष्ठ माता भगिनींसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिरात जनरल आरोग्य तपासणी ईसीजी ,व ब्लड प्रेशर (BP) , ब्लड शुगर , ब्लड गृप , एच बी तपासणी , डेंटल चेकअप , ..(हाडांच्या ठिसूळपनाची तपासणी) यासह मोफत औषध वाटप कॅल्शियम सप्लिमेंटरी मोफाय वाटप होणार आहे आहे .
स्थानिक तेली समाज मंगल कार्यालय, आठवडे बाजार, भुसावळ येथे सकाळी 10 ते 1 दरम्यान आयोजित आरोग्य शिबिरात महत्वपूर्ण आरोग्य तपासणी त्याही मोफत करण्यात येणार आहे . या शिबिरात जनरल आरोग्य तपासणी ईसीजी ,व ब्लड प्रेशर (BP) तपासण करीता तज्ञ डॉ शंतनू साहू
एमबीबीएस,DNB,FNB, CRITICAL CARE SPECIALIST INTENSIVIST गोल्डन अवर हॉस्पिटल, भुसावळ


डेंटल चेकअप साठी तज्ञ डॉ राकेश गोगिया
BUS,MDS(रूट कॅनाल स्पेशालिस्ट)
गुरुकृपा डेंटल क्लिनिक, भुसावळ


ब्लड शुगर , रक्त गट तसेच व ,Hb तपासणी
तज्ञ.. मनोज चौधरी, चौधरी लॅब, भुसावळ


  1. BMD तपासणी..(हाडांच्या ठिसूळपनाची तपासणी)

5.कॅल्शियम सप्लिमेंट्स..निखिल चौधरी, जनसेवा मेडिकल, भुसावळ या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांचे नेतृत्वात तपासणी होणार आहे . तरी

तरी समाजातील जास्तीत जास्त भगिनींनी या मोफत आर्रोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे..

नावनोंदणीसाठी अध्यक्षा सौ कविता अशोक चौधरी ( 9766732591) सचिव कु.उज्ज्वला बागुल ( 9422278732)
उपाध्यक्ष सौ.रेखा धूपे (.7385136955 ) सहसचिव सौ. प्रतिभा चौधरी ( 7499626970)सदस्य
सौ. वैशाली चौधरी (..7709905551 ) यांचेशी संपर्क साधावा असे प्रोजेक्ट चेअरमन तथा सल्लागार आ सौ वृषाली चौधरी व सहकारी यांनी कलविले आहे