भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वालिटी रनचे आयोजन जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी ९ मार्च रोजी शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर करण्यात आले आहे. तब्बल ४७२ महिलांनी यात नावनोंदणी केली असून नावनोंदणीची प्रक्रिया आता थांबविण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकास आयोजकांतर्फे टी शर्ट स्पर्धेच्या आदल्या दिवशी अर्थात शनिवारी ८ मार्च रोजी शहरातील प्रभाकर हॉल येथून वितरित केला जाईल. शिवाय स्पर्धेच्या दिवशी धाव यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रत्येक स्पर्धकास पदक प्रदान केले जाईल. स्पर्धेच्या अधिकृत टी शर्ट व पदकांचे विवरण अतिशय उत्साहात सर्व सहभागी स्पर्धकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी महिलांनी मोठा जल्लोष केला.
सर्वप्रथम पहाटे ७ वाजता सराव सत्र संपल्यानंतर शहरातील कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मैदानावर आयोजकांतर्फे या स्पर्धेसाठी प्रायोजक असलेले व विविध माध्यमातून मदत केलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष कार्यक्रमास सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी बढे कपिटल्स, भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड,माय फिटनेस जिम हे मुख्य प्रायोजक आहेत. भेल इंडियाच्या प्रतिनिधी पारुल वर्मा, माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर , राहत समूहाचे डॉ मेहफूझ अली व डॉ साजिया अली, कुशल ऑफसेटच्या संचालिका मंगला पाटील, कुकरेजा सुपर शॉपीचे संचालक संजय कुकरेजा, रनिंग कोच इरफान शेख व सायकलपटू दिलीप जोनवाल यांच्या हस्ते टी शर्ट व पदकांचे विवरण करण्यात आले. यावेळी असोसिएशनतर्फे असोसिएशनचे प्रमुख प्रा.प्रविण फालक, डॉ चारुलता पाटील,प्रविण वारके, सचिन अग्रवाल व प्रविण पाटील हे देखील उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ मेहफूझ अली यांनी आपल्या मनोगतातून शहरात इतक्या सकाळी मोठ्या संख्येने महिला धावायला येतात याबद्दल आनंद व्यक्त केला व आयोजकांचे कौतुक केले. यावेळी प्रमोद धनगर यांनी देखील मनोगत व्यक्त केले व सहभागी महिला स्पर्धकांना माय फिटनेस जिमच्या फी मध्ये सवलत देण्याचे जाहीर केले.
आयोजकांतर्फे डॉ चारुलता पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छोटू गवळी, निलांबरी शिंदे, स्वाती फालक, डॉ वर्षा वाडिले, ममता ठाकूर, माधुरी चौधरी,जयश्री चौधरी, माया पवार, पूनम कुलकर्णी,युवराज सूर्यवंशी,विलास पाटील, राजेंद्र ठाकूर यांनी सहकार्य केले.



